Completely happy Holi 2023 Messages in Marathi: 'आली आली होळी, अहंकार, वाईट विचार जाळी'....होळी पेटवून आपल्यातील अहंकार, वाईट विचार यांचे दहन करणे होय. म्हणून फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी भारतामध्ये होळी साजरी केली जाते. या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, शिमगा, धुळवड, होळी पौर्णिमा, धूलिवंदन व रंगपंचमी अशी विविध नावे आहेत. या उत्सवाला होलिका दहन असेही म्हणतात. कारण पुराणात सांगितलेल्या कथेनुसार, देवी होलिकेने आपल्याला मिळालेल्या वरदानाचा दुरुपयोग केल्याने ती अग्नित जळून खाक झाली. माणसातील या वाईट गुणाचा नाश व्हावा म्हणून देशभरात होलिका दहन केले आहे. या सणाचे पावित्र्य जपण्यासाठी आपण सोशल मिडियाद्वारे एकमेकांना शुभेच्छा देऊ शकतो.
होळीच्या निमित्ताने एकमेकांना फेसबुक, व्हॉट्सअॅप, ग्रीटिंग्स, इमेजेसच्या माध्यमातून आपण एकमेकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या पाहिजेत असे अनेकांना वाटते. त्यासाठी खास मराठीतून शुभेच्छा संदेश....
होळीच्या या पवित्र अग्नीत
अहंकार, वाईट विचारांचे दहन होवो
रंगांनी भरलेल्या या उत्सवाप्रमाणे
तुमचे आयुष्यही बहरून जावो
होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
खमंग पुरणपोळीचा बेत ठरला घरोघरी
रंगांनी न्हाऊन गेली ही दुनिया सारी
कोरोनाचे नियम पाळून करुया होळी साजरी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
होळीच्या अग्नीत जळून जाऊ दे निराशेची छाया काळी
एकमेकांचे तोंड गोड करू देऊनि पुरणपोळी
आनंदाने भरून जाऊ दे सर्वांची झोळी
हीच प्रार्थना करतो सण साजरा करुनि होळी
होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
होळी पेटू दे
रंग उधळू दे
मतभेद मिटू दे
प्रेमच प्रेम सर्वत्र बहरू दे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
ईडा-पीडा, दु:ख जाळी रे
आज वर्षाने आली होळी रे
रंगांची उधळण झाली रे
आज वाटतय लय भारी रे
होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
देशात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रकारे होळीचा उत्सव साजरा केला जातो. सण साजरा करण्याची पद्धत काहीही असली तरीही त्यामागचा उद्देश एकच आहे आपापसातील रागरुसवे विसरुन एकत्र यावे आणि आनंदाने सण साजरा करावा. सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा!