EVENTS & FESTIVALS

Buddha Purnima 2021: बुद्ध पौर्णिमेला यंदा चंद्रग्रहणासोबत 2 शुभ योग; पहा काय आहे त्याचं महत्त्व

Rate this post


Buddha Purnima 2021: बुद्ध पौर्णिमेला यंदा चंद्रग्रहणासोबत 2 शुभ योग; पहा काय आहे त्याचं महत्त्व
- Advertisement-

Buddha Purnima (File Photograph)

- Advertisement-

भारतामध्ये वैशाख पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima) म्हणून साजरी केली जाते. यंदा हा दिवस 26 मे दिवशी साजरा केला जाणार आहे. मान्यता अशा आहेत की या दिवशी भगवान गौतम बुद्ध (Gautam Buddha) यांचा जन्म झाला होता. दरम्यान यंदा 26 मे दिवशी बुद्ध पौर्णिमेला चंद्र ग्रहण देखील आहे. हे यंदाच्या वर्षामधलं पहिलं चंद्रग्रहण आहे. पण ते भारतामधून थेट दिसणार नाही. या वर्षीची बुद्ध पौर्णिमेमुळे खास बनली आहे पण त्यासोबतीने या दिवशी अजून दोन चांगले योगायोगा जुळून आल्याने हा दिवस खास झाला आहे. मग जाणून घ्या नेमके हे योग कोणते आहेत? काय आहेत त्याचे वैशिष्ट, महत्त्व?

दरम्यान भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू मान्यतांनुसार पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही प्रकारचं दान आणि पवित्र कुंड, नदीत स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. यंदा पौर्णिमा आणि ग्रहण एकाच दिवशी असल्याने त्याचे महत्त्व यावर्षी 26 मेला अधिकच वाढणार आहे.  (June 2021 Shubh Muhurat: दुकान, कार्यालय आणि कारखान्याच्या उद्घाटनसाठी जून महिन्यातील ‘या’ तारखा ठरतील शुभ, वाचा सविस्तर).

बुद्ध पौर्णिमेला यंदा 2 शुभ योग आहेत. ते म्हणजे या दिवशी अमृत सिद्धी योग आणि सवार्थ सिद्धी योग आहेत. या दोन्ही योगांच्या वेळेस शुभ कार्य केल्यास ते लाभदायक ठरतं अशी धारणा आहे. यंदा बुद्ध पौर्णिमेला दिन सूर्य, नक्षत्र रोहिणी आणि नक्षत्र पद अनुराधा व ज्येष्ठा असणार आहे. Buddha Purnima 2021: बुद्ध पौर्णिमा कधी आहे? तारीख, पूजा विधी, शुभ मुहूर्त, महत्त्व जाणून घ्या.

- Advertisement-

बुद्ध पौर्णिमेला सत्यविनायक व्रतही ठेवण्याची रीत आहे. असे म्हणतात की, या दिवशी उपवास केला तर धर्मराज यमदेव प्रसन्न होतो. यामधून अकाली मृत्यूचा धोका टळतो. तुम्ही पौर्णिमेला दान करणार असाल तर साखर, पांढरे तीळ दान करा. यासोबतच कोणतेही पांढरे पदार्थ दान केले जाऊ शकतात. Chandra Grahan Might 2021 Date: यंदाच्या वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण 26 मे दिवशी; पहा ग्रहणाचा कालवधी, सुतक काळ असेल का? सह सारी महत्त्वाची माहिती.

भारतात अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे पौर्णिमेच्या यंदाच्या ग्रहणानंतर पवित्र कुंडाऐवजी घरीच आंघोळ करू शकता. आंघोळीच्या पाण्यात ग&गाजल मिसळून त्याची अंघोळ केली जाऊ शकते. तेच सध्या सुरक्षित आहे.

- Advertisement-

टीप – वरील लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहला आहे. यामधील कोणत्याही गोष्टीची पुष्टी लेटेस्टली मराठी करत नाही.
Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker
close button